राज्यातील 24 नगरपरिषद, नगर पंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलल्या; सुधारीत वेळापत्रक जाहीर, कधी होणार मतदान?
मुंबई : नगर परिषदा व नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील झालेल्या प्रकरणांसंदर्भात २३ नोव्हेंबर किंवा त्यानंतर निर्णय आलेल्या २४ अध्यक्षपदांच्या आणि विविध ठिकाणच्या १५४ सदस्यपदाच्या जागांवरील निवडणुकांची प्रक्रिया अपील कालावधीनंतरच्या पुढील टप्प्यापासून सुधारित कार्यक्रमानुसार राबविली जाईल, त्यासाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. उर्वरित अन्य सर्व ठिकाणी नियोजित निवडणूक कार्यक्रमानुसार आज, २ डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
अध्यक्षपदासंदर्भातील अपीलांचा निकाल उशिरा आलेल्या नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या संपूर्ण क्षेत्रासाठी निवडणूक प्रक्रिया सुधारित कार्यक्रमानुसार राबवली जाईल. अध्यक्षपदासोबतच सदस्यपदांची एकत्रित निवडणूक घेण्याची कायद्यात तरतूद आहे. ज्या ठिकाणच्या सदस्यपदासाठी अपील होते, तिथे मात्र फक्त त्या जागेपुरताच सुधारित निवडणूक कार्यक्रम राबविला जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
Comments
Post a Comment