राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाले. मात्र ही मतदान प्रक्रिया राबवली जात असताना अंतिम दोन दिवसांमध्ये राज्यातील काही नगरपालिकांचे मतदान लांबणीवर टाकत ते २० डिसेंबर रोजी तसेच त्यांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार असल्याचा निर्णय घेतला गेला. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर सर्वच निवडणुकांची मतमोजणी लांबणीवर पडली. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. आज या प्रकरणाची सुनावणी झाली असताना सर्वोच्च न्यायालयाने मतमोजणी २१ डिसेंबराच होणार असल्याचे सांगितले आहे.

सरन्यायाधीश सूर्य कांत व न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर मतमोजमीच्या विषयासंदर्भात सुनावणी पार पाडली. यावेळी खंडपीठाने निवडणुकांचा जो कालावधी निश्चित केला आहे. त्याच्या आत म्हणजेच ३१ जानेवारीपूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. कोणत्याही कारणास्तव निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न होऊ नये, असेही खंडपीठाने सांगितले.
सर्वोच्च न्यायालयात काय झाले?
सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षकारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर आपला निकाल दिला. २० डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुका काही कारणास्तव जर पुढे ढकलल्या गेल्या तर पुन्हा निवडणुकीची प्रक्रिया पुढे ढकलली जाऊ शकते. मात्र तरीही २१ डिसेंबर रोजी २ डिसेंबरला झालेल्या निवडणुकांचा निकाल जाहीर केला जावा. तसेच उच्च न्यायालयात ज्या याचिका प्रलंबित आहेत, त्यांचा कुठलाही व्यत्यय निवडणूक कार्यक्रमात येता कामा नये, असेही सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितले.
Comments
Post a Comment